2863 views
वडगाव मावळ दि.27 (प्रतिनिधी: किरण यादव) कामशेत इंद्रायणी कॉलनी येथील श्लोक विष्णू जाधव वय 11 याचे अकस्मात अल्पशा आजाराने गुरुवारी (दि.26) पहाटे 4 वा मृत्यू झाला.
इंद्रायणी कॉलनी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत चौथी वर्गात शिकत होता. प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असल्याने श्लोक सर्वांचा लाडका होता. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने शाळेतील विदयार्थी व शिक्षकांचे डोळे पाणावले.
रविवारी (दि.15) श्लोक याला ताप आल्याने तळेगाव दाभाडे येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सेवाधाम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ताप कमी होत नसल्याने पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना, श्लोक याचा गुरुवारी (दि.26) पहाटे 4 वा मृत्यू झाला. विष्णु वसंत जाधव यांना 3 मुले व 1 मुलगी असे 4 अपत्य झाली होती त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.
श्लोक ला 1 लाख 20 हजार रुपयांचे इंजेक्शन औषधाचा अतिरीक्त डोस दिले. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हात उसने तसेच बचत गटातून एकूण 4 लाख 50 हजार रुपये घेवून खर्च करूनही श्लोक वाचला नाही. असे विष्णु जाधव यांनी सांगितले. मुलगा गेला कर्जाचा डोंगर झाला आता काय करावे असा प्रश्न उपस्थित केला. दवाखाना कोणाच्या कुटुंबात येवू नये असे बोलताना अश्रू वाहू लागले.