2958 views
तळेगाव दाभाडे दि.20 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात तीन ठिकाणी दोन दुचाकीवरून अज्ञात चार ते पाच जणांकडून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे ही घटना गुरुवारी (दि.20) रात्री 8:15 वा. सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी धाव घेऊन शहरात बंदोबस्त वाढविला आहे.
तळेगाव दाभाडे दि.20 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात तीन ठिकाणी दोन दुचाकीवरून अज्ञात चार ते पाच जणांकडून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे ही घटना गुरुवारी (दि.20) रात्री 8:15 वा. सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी धाव घेऊन शहरात बंदोबस्त वाढविला आहे. पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणी पंचनामे केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णवर यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे शहरात दोन दुचाकीवरून अज्ञात चार ते पाच जणांकडून तुकारामनगर गजानन महाराज मंदिर, शाळा चौक, मारुती मंदिर चौक आदी ठिकाणी हवेत गोळीबार केला. मास्क घालून आलेल्या चार ते पाच जणांनी हवेत गोळीबार केला. अशी प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळली आहे. या प्रकारामुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच शहरात बंदोबस्त वाढवला असून तपास सुरू केला आहे. हवेत गोळीबार झालेल्या ठिकाणी निकामी झालेली काडतूसे पोलिसांना आढळून आली आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शीच्या माहितीच्या आधारे सध्या पोलिस तपास करत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने पोलीस पथके रवाना केली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने फुटेजवरून आरोपी लवकरच जेरबंद होण्याचा विश्वास व्यक्त केला.
तालुक्याचे महत्वाचे शहर असलेले तळेगाव दाभाडे शहर भयमुक्त केव्हा होणार? महाराष्ट्र राज्य गृह विभाग काय करत आहे. पोलिसांचा गुन्हेगारीवरचा वचक कमी झाला का? दिवसा ढवळ्या खुनाच्या घटना शहरात घडल्या असून या घटनेने नागरिकांमध्ये भयानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.