3364 views
लोणावळा दि.26 (प्रतिनिधी) सातबारा उताऱ्यावर पीक नोंद करण्याच्या कामासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी खांडशी तलाठ्याला रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.25) सायंकाळी 5:50 वा. कार्ला मंडलाधिकारी कार्यालयात कार्ला ता.मावळ येथे घडली. बुधवारी (दि.26) मध्यरात्री 1:35 वा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.
लोणावळा दि.26 (प्रतिनिधी) सातबारा उताऱ्यावर पीक नोंद करण्याच्या कामासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी खांडशी तलाठ्याला रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.25) सायंकाळी 5:50 वा. कार्ला मंडलाधिकारी कार्यालयात कार्ला ता.मावळ येथे घडली.
बुधवारी (दि.26) मध्यरात्री 1:35 वा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.
अंकुश रामचंद्र साठे (वय 43, रा.तलाठी सजा खांडशी ता.मावळ मूळ वरुड भैरोबा मंदिराजवळ ता.खटाव जि.सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तक्रारदार शेतकरी यांच्या गट नं. 9/1 सातबारा उताऱ्यावर गिनीगवत अशी नोंद झालेली आहे. ती गिनीगवत ची नोंद कमी करुन दुरुस्त नवीन सातबारा देण्यासाठी तलाठी अंकुश साठे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे 10,000 रुपयेच्या लाचेची मागणी केली. त्यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने सापळा रचून आरोपी तलाठी अंकुश साठे यांना कार्ला मंडलाधिकारी कार्यालयात लाच घेताना रंगेहात अटक केली.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. आरोपीला बुधवारी (दि.26) न्यायालयात हजर करणार आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचा आदेशान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर
करत आहेत.