1571 views
रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत ग्रामस्थांवर दगडफेक करणाऱ्या युवकाचा ग्रामस्थांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.5) रात्री 9:30 वा. घडली. भाग्यश्री अनिल कांबळे (वय 19 रा. खराडी बायपास, खांदवेनगर, पुणे ) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. गु.र.नं.270/2024 भा.द.वि.कलम- 302, 326, 324, 504, 506, 34, 143, 147, 148, 149, सह शस्त्र अधिनिअम कलम 4 (25). अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) कामा फार्म कुसुर खांडी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत ग्रामस्थांवर दगडफेक करणाऱ्या युवकाचा ग्रामस्थांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.5) रात्री 9:30 वा. घडली.
भाग्यश्री अनिल कांबळे (वय 19 रा. खराडी बायपास, खांदवेनगर, पुणे ) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
गु.र.नं.270/2024 भा.द.वि.कलम- 302, 326, 324, 504, 506, 34, 143, 147, 148, 149, सह शस्त्र अधिनिअम कलम 4 (25). अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय बाबाजी जगताप (वय 26, रा. चंदननगर, पुणे) हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
अशोक तुरडे, मोहन तुरडे, सुभाष तुरडे व 05 ते 07 अनोळखी इसम (सर्व रा. कुसूर ता मावळ जि पुणे) यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार
मयत अक्षय जगताप याने आरोपीचा भाऊ अंकुश तुरडे याला बुधवारी (दि. 5) रात्री 8.30 वा. कुसुर ते खांडी रोड लगत भांडण केले, मयत अक्षय जगताप याने अंकुश तुरडे यास नाकावर बुक्की मारून त्याला जखमी केल्याच्या कारणावरुन आरोपी अशोक तुरडे, मोहन तुरडे, सुभाष तुरडे इतर 05 ते 07 अनोळखी लोकांनी लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व लोखंडी सळ्याच्याने अक्षय जगताप यांच्या डोक्यात व पाठीवर हातापायावर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करीत आहेत. आरोपी अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे, लवकरच आरोपींना अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.