4250 views
कामशेत दि.15 (प्रतिनिधी) घरी काही न सांगता, नायगाव हद्दीतून महामार्गावर दुचाकीला हात करून वडगाव दिशेने गुरुवारी (दि.13) रात्री 8 वा. निघून गेली आहे. अद्यापही मिळून न आल्याने कामशेत पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची खबर अभिषेक मनोहर टाकळकर रा. बुधवडी ता.मावळ यांनी शुक्रवारी (दि.14) दिली. या घटनेला तीन दिवस झाले आहेत.
सोनाली मनोहर टाकळकर (वय 19 रा.बुधवडी ता.मावळ जि.पुणे ) हरवलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली टाकळकर ही घरी काही न सांगता, नायगाव हद्दीतून महामार्गावर दुचाकीला हात करून वडगाव दिशेने गुरुवारी (दि.13) रात्री 8 वा. निघून गेली आहे. अद्यापही मिळून न आल्याने कामशेत पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची खबर दाखल केली आहे.
वर्णन रंगाने सावळी उंची 5.3 फुट अंगाने सडपातळ बांधा, नेसणीस मेहंदी कलरचा कुर्ता व पांढरे रंगाची पॅन्ट गळ्यामध्ये सोन्याची चैन, पायात गुलाबी कलर चप्पल, बोली भाषा मराठी, हिंदी बोलते.
सदरची मिसिंग मुलगी मिळुन आल्यास किंवा मिसिंग मुलीबाबत काही माहिती मिळाल्यास खालील नंबरशी संपर्क करावा.
1) कामशेत पोलीस स्टेशन नं (02114) 262440
2) पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील मो.नं.9923407311
3) पोलीस हवालदार नितीन कळसाईत मो. नं. 9850259911