undefined खासदार सुनेत्रा पवार

434 views

वडगाव मावळ दि.11 (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीने महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, कर्तृत्ववान मुली व महिलांचा सन्मान तसेच प्रथमच मावळ तालुक्यात लकी ड्रॉ विजेत्या महिलांना हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन हा महिलांचा सन्मानच केला आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. असे प्रतिपादन केले. इंदोरी प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सौभाग्यवती मावळ कार्यक्रमाच्या प्रसंगी शनिवारी (दि.8) रात्री 10 वा. त्या बोलत होत्या.


Author : Admin
Publisher : admin
Update : 23 hours ago
Date : Tue Mar 11 2025

image



खासदार पवार म्हणाल्या अशा कार्यक्रमातून महिलांचे नेतृत्व घडते. त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो. महिलांनी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा.


आमदार सुनील शेळके म्हणाले प्रशांत भागवत गेली अनेक वर्ष सामाजिक तसेच राजकारणात सक्रिय आहेत समाजोपयोगी उपक्रम राबवून अनेकांना मदतीचा हात देतात. महिला दिनानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून महिलांना हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन दिले. महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्याच्या पाठीशी महिलांचा आशीर्वाद भक्कमपणे असतो जसा माझ्या मागे आहे.


सौभाग्यवती मावळ 2025 च्या होंडा ऍक्टिव्हा टूव्हिलरच्या विजेत्या ठरल्या रूपाली बांगर तर द्वितीय क्रमांक फ्रिज राधा सोनवणे, तृतीय क्रमांक वॉशिंग मशीन विशाखा तरास, चतुर्थ क्रमांक एलइडी टीव्ही सुकन्या चोरघे, पाचवा क्रमांक पिठाची गिरणी नेहा शिंदे, सहावा क्रमांक मोबाईल सुचित्रा ढेरंगे, सातव्या क्रमांक फूड प्रोसेसर दीपिका कावडे, आठव्या क्रमांक सोन्याची नथ स्नेहल मानकर आदी विजेत्या ठरल्या.


याप्रसंगी खासदार सुनेत्रा वाहिनी पवार, आमदार सुनील शेळके, महागायक आनंद शिंदे, एकविरा देवस्थान विश्वस्त दीपक हुलावळे, पंचायत समिती माजी सदस्य साहेबराव करके, कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिका सुनील शेळके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, फिल्म अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, जुई गडकरी, गीतकार अक्षय आल्हाट, निवेदक क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका सह्याद्री मळेगावकर आदींनीसह मान्यवर व हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.


यावेळी इंदोरी येथील बहुजन विकास अधिकारी सोनल आकाश शिंदे खांदवे, माळवाडी येथील महसूल सहाय्यक स्नेहल अशोक दाभाडे, राज्य महसूल अधिकारी अर्चना अनिकेत जाधव, सुदवडी येथील पोलीस उप निरीक्षक पूजा मोहन तांबे, महाराष्ट्र पोलीस निकिता चिमाजी फलके, वैष्णवी बाळू यादव, नवलाख उंबरे येथील खेळाडू समिक्षा महेश शिर्के, माळवाडी आदर्श सरपंच पल्लवी संदीप दाभाडे, गोडुंब्रे माजी सरपंच आशालता गोपीनाथ चोरघे, कुस्तीपटू हर्षदा प्रवीण बोडके, कार्यक्षम सरपंच मंगल कालिदास गाडे व वैष्णवी योगेश दाभाडे आदी कर्तृत्ववान मुली व महिलांचा भव्य सन्मान करण्यात आला.

प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित महा मिनिस्टर सौभाग्यवती लकी ड्रॉ मध्ये 10 महिलांना हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन कूपन काढण्यात आले. संस्कृती ससाणे , अश्विनी पांढरे, सारिका शिवेकर, आरती सोरटे, उषा सदाशिव, नीलम काळे, शामल शिनगारे, कल्पना कराळे, शारदा इंगळे, जिजाबाई चोरघे यांच्यासह 56 महिलांनी हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन घेतले.


प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले.

निवेदन क्रांती नाना मळेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन पौर्णिमा भोरहिंगे यांनी केले.

 प्रशांत भागवत आभार प्रसंगी म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत आहे. ज्येष्ठ नेत्यांकडून प्रेरणा घेत समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. आजच्या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती लावली त्यांचे तसेच मान्यवरांचे मनापासून आभार.




लेटेस्ट अपडेट्स

434 views
Image

प्रशांत भागवत यांनी खरा महिलादिन साजरा केला : खासदार सुनेत्रा पवार

वडगाव मावळ दि.11 (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीने महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, कर्तृत्ववान मुली व महिलांचा सन्मान तसेच प्रथमच मावळ तालुक्यात लकी ड्रॉ विजेत्या महिलांना हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन हा महिलांचा सन्मानच केला आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. असे प्रतिपादन केले. इंदोरी प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सौभाग्यवती मावळ कार्यक्रमाच्या प्रसंगी शनिवारी (दि.8) रात्री 10 वा. त्या बोलत होत्या.


Read More ..
438 views
Image

नवले, भेगडे, दाभाडे यांच्यासह आमदार शेळके यांच्या उमेदवारीने चर्चा

वडगाव मावळ दि.9 (प्रतिनिधी) संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालक तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांचे भाऊ , ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याने निवडणुकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला मोठे उधाण आले आहे.


Read More ..