607 views
वडगाव मावळ दि.9 (प्रतिनिधी) शिक्षक नेते श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी सचिव कै. धोंडिबा यशवंत खांडभोर यांच्या पत्नी सुमन धोंडिबा खांडभोर वय 71 यांचे रविवारी (दि.9) सायंकाळी 5:30 वा. अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते राज खांडभोर व युवा उद्योजक शरद खांडभोर यांच्या त्या आई, सुदुंबरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माणिक गाडे यांच्या त्या सासू होत.
त्यांच्यावर आंदर मावळातील नागाथली स्मशानभूमीत रविवारी रात्री 9 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.